10
सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना
ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत.
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो,
पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु:खी करतो.
दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते.
पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते.
परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही,
परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो.
आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात.
पण उद्योग्याचा हात संपत्ती मिळवतो.
उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे,
परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे.
नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात,
पण बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते;
पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते.
जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो,
परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.
10 जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो,
बडबड्या मूर्खाची अधोगती होते*.
11 नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे,
परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
12 द्वेष भांडण उत्पन्न करतो;
परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
13 विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते,
परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.
14 शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात,
परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते.
15 श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे;
गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो.
16 नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे;
दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे.
17 जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे,
पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो.
18 जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे,
आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे.
19 जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही,
परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे.
20 जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे;
पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे.
21 नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात,
पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो.
22 परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते,
आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही.
23 दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे,
परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे.
24 दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल,
पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल.
25 दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो,
पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे.
26 जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना,
तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.
27 परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते,
पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.
28 नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल,
पण दुष्टाची वर्षे कमी होतील.
29 जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील,
दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे.
30 नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत,
परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत.
31 नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते,
पण कपटी जीभ कापली जाईल.
32 नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते,
पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते.
* 10:10 खुले शब्दताडण शांती प्रस्थापित करते