25
बाबेलमुळे सत्तर वर्षे वाताहत
यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाकडे आलेले वचन, ते असे, यहूदाचा राजा योशीया, याचा मुलगा, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या पाहिल्या वर्षात, यहूदा लोकांस आणि यरूशलेमधील राहणाऱ्यांना यिर्मया संदेष्ट्याने पुढील संराष्ट्र घोषीत केला: यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून तर गेली तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन माझ्याकडे येत आले आहे, मी तेव्हापासून आजपर्यंत तुम्हास ते ऐकवित आलो. पण तुम्ही ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठवले, ते बाहेर जाण्यासाठी उत्सुक होते, पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. ते संदेष्टे म्हणाले, “प्रत्येक मनुष्य आपल्या वाईट कृत्यांपासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, आणि जे राष्ट्र परमेश्वराने तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना कायमचा राहण्यास दिला, त्यामध्ये जा. म्हणून दुसऱ्या दैवतांना अनुसरायला आणि त्यांना पाया पडायला त्यांच्या मागे जाऊ नका आणि तुम्ही त्यास आपल्या हातांच्या कामाने मला राग आणू नका, म्हणजे मी तुमचे काही वाईट करणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही माझे ऐकले नाहीत, आणि तुम्हावर अरिष्ट यावे म्हणून तुम्ही आपल्या हातांच्या कामाने मला राग आणून दिला.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन. 10 त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल असे मी करीन. 11 आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील. 12 परमेश्वर असे म्हणतो, आणि असे होईल सत्तर वर्षे संपल्यावर, मी बाबेलाच्या राजाला आणि त्या राष्ट्राला आणि खास्द्यांच्या देशाला त्यांच्या दुष्कृत्यांमुळे शिक्षा करीन.” त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन. 13 आणि त्या देशाविरूद्ध जी काही वचने मी बोललो, म्हणजे जे काही या पुस्तकात लिहीले आहे, जे सगळ्या राष्ट्रांविषयी यिर्मयाने भविष्य सांगितले ते मी त्यांच्यावर आणीन. 14 त्यांना राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.
राष्ट्रांसाठी संतापरूप प्याला
15 कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, त्याने मला हे सांगितले: “माझ्या हातातील क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला घे आणि मी तुला पाठवतो त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव. 16 कारण ते हा द्राक्षरस पितील आणि जी तलवार मी त्यांच्यामध्ये पाठवीन तिच्यामुळे ते मागेपुढे डोलतील व वेड्याप्रमाणे वागतील.” 17 मग मी परमेश्वराच्या हातातून द्राक्षरसाचा प्याला घेतला. देवाने मला पाठवलेल्या त्या सर्व राष्ट्रांत मी प्यायला लावला. 18 यरूशलेम, यहूदा शहर आणि तिच्यातील राजे आणि नेते यांना मी तो प्याला दिला, म्हणजे वैराण, विस्मय व वाळवंट, आणि फुत्कार व शाप असे होतील. 19 दुसऱ्या राष्ट्रांनाही तो प्यावा लागेल, मी मिसरच्या राजा फारो, त्याच्या अधिकाऱ्यांना, त्याच्या सेवकांना, आणि त्याच्या लोकांस, 20 मी सर्व मिश्रित लोक, अरब व ऊस देशातील राजे, पलिष्ट्यांच्या देशातील सर्व राजे, अष्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. 21 आणि अदोम, मवाब व अम्मोन यामधील राजांनाही द्राक्षरस प्यायला लावले. 22 आणखी सोरच्या व सीदोनाचे सर्व राजे, समूद्राच्या दुसऱ्या बाजूस असणारे सर्व राजे, 23 आणि ददान, तेमा व बूज केसांच्या या कडा कापलेले सर्व लोक, 24 अरबस्तानातील सर्व राजे, व जे मिश्रित लोक रानांत राहतात त्यांचे सर्व राजे, 25 आणि जिमरी, एलाम व माद्य येथील सर्व राजे, 26 उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळचे राजे या सर्वांना, या पृथ्वीवर असणारे सर्व, आपल्या राज्यांसहीत, भावांसहीत, त्या सर्वांना मी तो प्याला प्या प्यायला लावला आहे. पण बाबेलचा राजा, त्या सर्वांच्या नंतर या प्याल्यातून पिईल. 27 “परमेश्वर मला म्हणाला, यिर्मया, तू त्यांना असे सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो: प्या आणि त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा, पडा आणि मी पाठवत असलेली तलवार येण्यापर्यंत परत उठू नका. 28 मग ते तुझ्या हातातून प्यायला पिण्यास तयार नसतील तर, तू त्यांना असे सांग सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही खरोखरच या प्याल्यातून पिणारच. 29 कारण पाहा! माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगरावर जर मी आपत्ती आणत आहे, तर तुम्हास शिक्षा होणार नाही असे कसे? तुमची सुटका होणार नाही, कारण मी पृथ्वीवरील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तलवारीला पाठवणार आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 30 “तर यिर्मया, तू त्यांना हे भविष्यवचन सांग, त्यांना बोल:
परमेश्वर उंचावरुन गर्जना करतो, आणि त्याच्या पवित्र मंदिरातून आपला शब्द उच्चारील,
तो त्याच्या कळपाविरूद्ध गर्जना करील. द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, तसा, देशाच्या सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तो ओरडेन.
31 तो आवाज पृथ्वीच्या शेवटापर्यंत येणार, कारण परमेश्वराचा विवाद राष्ट्रांविरूद्ध आहे, तो त्यांचा न्यायनिवाडा करणार. आणि तो सर्व देहावर न्यायव्यवस्था चालवणार. दुष्टांना तो तलवारीस देणार.” परमेश्वर असे म्हणतो.
32 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “अरिष्टे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पुढे जाणार,
आणि पृथ्वीवरच्या अतिदूरच्या ठिकाणाहून वादळाची सुरुवात होईल.”
33 आणि जे परमेश्वरापासून मारले गेले, त्या लोकांची प्रेते पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पसरतील. त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही किंवा ती गोळा करणार नाही आणि पुरणारही नाही. शेणाप्रमाणे ती जमिनीवर पडतील.
34 मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा.
कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल.
35 मेंढपाळांना लपायला कोठेही आश्रय राहणार नाही. आणि कळपातील धन्यांना सुटता येणार नाही.
36 मग मेंढपाळांच्या दुःखाचे रडणे आणि कळपाच्या धन्याचा विलाप तिथे असेल.
कारण परमेश्वर त्यांच्या कळपाचा विनाशक झाला आहे.
37 त्या शांत कुरणांचा नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवंट होतील. परमेश्वराचा संतप्त क्रोध हा,
38 जसा गुहेत राहणाऱ्या तरुन सिंहाप्रमाणे, ज्याने आपली गुहा सोडली आहे त्याप्रमाणे असेल.
कारण पीडणाऱ्या तलवारींमुळे व त्याच्या संतप्त क्रोधामुळे त्यांचा देश ओसाड झाला आहे.