7
इतरासना दोष काढाना बाबत
(लूक ६:३७-३८,४१-४२)
1 कोणलेच दोषी ठरावु नका, म्हणजे देव तुमले दोषी ठरावनार नही.
2 ज्याप्रकारमा तुम्हीन न्याय करशात, त्याच प्रकारमा देव तुमना न्याय करी, अनी ज्या मापघाई तुम्हीन मोजीन दिशात. त्याच मापघाई तुमले मोजीन देवामा ई.
3 तुना डोयामाधलं मुसळ न दखता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ कशाले दखस?
4 किंवा तुना डोयामाधलं कुसळ माले काढु दे हाई आपला भाऊले तु कसं सांगस? दख, तुना डोयामा तर मुसळ शे.
5 अरे ढोंगी, पहिले तुना डोयामाधलं मुसळ काढी टाक म्हणजे तुना भाऊना डोयामाधलं कुसळ काढाकरता तुले स्पष्ट दखाई.
6 जे पवित्र शे ते कुत्रासले देऊ नका, अनी मोती डुकरसनासमोर टाकू नका, टाकशात तर त्या आपला पायखाल चेंदतीन अनी पल्टीसन तुमले फाडतीन.
प्रार्थनानं महत्व
(लूक ११:९-१३)
7 मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई;
8 कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस, त्याले सापडस अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास.
9 आपला पोऱ्यानी जर भाकर मांगी तर तो त्याले दगड दि?
10 अनी मासा मांगा तर त्याले साप दि, तुमनामा असा कोणता बाप शे?
11 जर तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं तुमले समजस, तर ज्या तुमना स्वर्गना देवबाप जोडे मांगतस, त्यासले तो कितल्या चांगल्या वस्तु अनं देणग्या दि?
12 यामुये लोकसनी तुमनासंगे जसं वागाले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे. तसं तुम्हीन बी त्यासनासंगे वागा, कारण मोशेना नियमशास्त्र अनी संदेष्टा, हाईच शिकाडतस.
दोन रस्ता
(लूक १३:२४)
13 धाकला दरवाजातीन मजारमा जा; कारण नाशकडे जावाना दरवाजा मोठा शे, अनं रस्ता पसरट शे, अनी त्यानामातीन जाणारा बराच शेतस;
14 पण जिवनकडे जावाना दरवाजा, अनी रस्ता छोटा शे. अनं ज्यासले तो सापडस त्या थोडाच शेतस.
खरा अनी खोटा शिक्षक
(लूक ६:४३-४४)
15 खोटा संदेष्टासपाईन संभाळीन राहा, कारण त्या मेंढरसना रूपमा येतीन, पण त्या मझारतीन क्रुर लांडगा शेतस.
16 तुम्हीन त्यासले त्यासना फळवरतीन वळखशात, कारण काटासना झाडवरतीन द्राक्ष अनं रिंगनीना झाडवरतीन अंजिर काढतस का?
17 त्याचप्रमाणे चांगला झाडले चांगलं फळ येस अनं वाईट झाडले वाईट फळ येस.
18 चांगला झाडले वाईट फळ येस नही, अनं वाईट झाडले चांगलं फळ येस नही.
19 ज्या-ज्या झाडले चांगलं फळ येस नही ते प्रत्येक झाड तोडीसन अग्नीमा टाकामा येस.
20 यामुये तुम्हीन त्यासले त्यासना फळवरतीन वळखशात.
मि तुमले वळखस नही
(लूक १३:२५-२७)
21 माले प्रभुजी, प्रभुजी म्हणनारा सर्वासना स्वर्गना राज्यमा प्रवेश व्हई अस नही; तर जो मना स्वर्गना पिताना ईच्छाप्रमाणे वागस त्याना प्रवेश व्हई.
22 न्यायना दिनले बराचजन माले सांगतीन, प्रभुजी-प्रभुजी आम्हीन तुना नावतीन संदेश दिधा, तुना नावतीन भूतं काढात, अनी तुना नावतीन मोठमोठला चमत्कार करात नही का?
23 तवय मी त्यासले स्पष्ट सांगसु की, मनी अनी तुमनी कधीच ओळख नव्हती; अहो पापीसवन मनापाईन दूर व्हा.
दोन घरसना पाया
(लूक ६:४७-४९)
24 जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध;
25 मंग पाऊस पडना, पूर वना, वारा बी सुटना, अनी त्या घरले लागना; तरी ते घर पडनं नही, कारण त्याना पाया खडकवर बांधेल व्हता.
26 त्याचप्रमाणे जो कोणी मनं वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस नही तो एक मुर्ख माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर वाळूवर बांधं,
27 मंग पाऊस पडना, पुर वना, वारा बी सुटना, अनं त्या घरले लागना तवय ते लगेच पडीसन त्याना नाश व्हयना.
येशुना अधिकार
28 येशुनी आपलं बोलनं बंद करावर अस व्हयनं की, त्या लोके त्यानं शिक्षण ऐकीन थक्क व्हई गयात;
29 कारण तो शास्त्री लोकेसनामायक नही तर पुरा अधिकार त्यालेच शे, असा शिकाडी राहींता.