23
येशु शास्त्री अनं परूशीसना जाहीरपणे निषेध करस
(मार्क १२:३८,३९; लूक ११:४३,४६; २०:४५,४६)
1 तवय येशु, लोकसनी गर्दीले अनी त्याना शिष्यसले बोलना,
2 शास्त्री अनं परूशी या मोशेना आसनवर बठेल शेतस.
3 यामुये त्या जे काही तुमले सांगतीन ते पाळा अनं तस वागा, पण त्या जश करतस तस करू नका; कारण त्या जे सांगतस ते करतस नही,
4 त्या जड ओझं बांधीन लोकसना खांदावर टाकतस, पण त्या स्वतः त्याले बोट बी लावतस नही;
5 अनी त्या आपला सर्वा कामे लोकसले दखाडाकरता करतस, त्या आपला ताईत मोठा बनाडतस अनं आपला कपडासना किनारले गोंडा लाईन आम्हीन भलता पवित्र शेतस असा दखाडतस.
6 पंगतमा मुख्य स्थान अनं सभास्थानमा मुख्य आसन,
7 बजारमा लोकसकडतीन आदर करी लेवाणं अनं स्वतःले गुरजी, अस म्हणी लेवाणं हाई त्यासले आवडस
8 तुम्हीन स्वतःले लोकसकडतीन गुरजी म्हणी लेवु नका; कारण तुमना गुरू एक शे अनं तुम्हीन सर्व भाऊ-भाऊ शेतस.
9 जगमा कोनले बी पिता म्हनान नही, कारण तुमना पिता एकच शे अनं तो स्वर्गामा शे.
10 तसच तुम्हीन स्वतःले स्वामी म्हणी लेवु नका कारण तुमना एकच स्वामी शे, तो म्हणजे ख्रिस्त शे.
11 तुमनामा जो मोठा शे त्यानी तुमना सेवक व्हवाले पाहिजे.
12 जो कोणी स्वतःले मोठा माणुस समजी, त्याले सर्वात खालना माणुस म्हणतीन, अनी जो कोणी स्वतःले लिन नम्र बनाडी त्या माणुसले मोठा म्हणतीन.
येशु ढोंगीपननी निंदा करस
(मार्क १२:४०; लूक ११:३९-४२,४४,५२; २०:४७)
13 अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण लोकसनी मझार जावाले नको म्हणीन तुम्हीन स्वर्गना राज्यनं दार बंद करतस; तुम्हीन स्वतःबी मझार जातस नही अनी मझार जाणारासले बी जाऊ देतस नही.
14 अरे शास्त्री अनी परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन विधवासना घरसना नुकसान करी टाकतस अनं दिखावाकरता मोठी प्रार्थना करतस, यामुये तुमले सर्वात जास्त भोग भोगना पडी.
15 अरे शास्त्रीसवन अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन एक शिष्य बनाडाकरता जमीन अनं समुद्र पालथा घालतस अनी तो भेटना तर तुम्हीन त्याले स्वतःपेक्षा दुप्पट नरकना भागीदार बनाडतस.
16 अरे वाट दखाडणारा आंधयासवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन म्हणतस, कोणी मंदिरनी शप्पथ लिधी तरी काही हरकत नही पण मंदिरमा जे सोनं शे, त्यानी शप्पथ लिधी तर ती मोडता येवाव नही.
17 अरे मुर्ख अनं आंधया लोकसवन, मोठं काय शे, ते सोनं की ज्यामुये ते सोनं पवित्र व्हयेल शे ते मंदिर?
18 तुम्हीन म्हणतस कोणी वेदीनी शप्पथ लिधी तर काहीच हरकत नही, पण जर कोणी तिनावर अर्पण करतस त्या अर्पणनी शप्पथ लिधी तर ती मोडता येवाव नही.
19 अरे आंधयासवन, मोठं काय शे; अर्पण की, अर्पणले पवित्र करस ती वेदी?
20 पण जो कोणी वेदीनी शप्पथ लेस तो तिनी अनी तिनावर जे काही ठेयल शे त्यानी शप्पथ लेस;
21 अनी जो कोणी मंदिरनी अनं त्यामा राहणारा देवनी शप्पथ लेस;
22 अनी जो स्वर्गनी शप्पथ लेस तो देवना सिंहासन नी अनी त्यावर जो बठस त्यानी बी शप्पथ लेस.
23 अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण पुदिना, सौफ अनी जिरा याना दशांश तुम्हीन देतस अनी नियमशास्त्रमाधल्या मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया अनं ईश्वास यासले तुम्हीन धाकल्या गोष्टी समजीन सोडी दिध्यात; ह्या गोष्टी कराले पाहिजे व्हत्यात, तसच आखो महत्वन्या गोष्टी शेतस त्यासले पण तुम्हीन सोडी देऊ नका.
24 अरे आंधळी वाट दखाडनारासवन, तुम्हीन मच्छरले निवडीन काढतस अनं उंटले गिळी टाकतस.
25 अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन तुमना धिक्कार असो! तुम्हीन बी आपली ताटवाटी बाहेरतीन घाशीन पुशीन स्वच्छ करतस पण मझारमा हावरटपणा अनं जुलूम यासनी घाण भरी ठेयल शे.
26 अरे आंधळ्या परूशी, पहिले वाटी मझारतीन साफ करा, म्हणजे ती बाहेरतीन साफ व्हई.
27 अरे शास्त्रीसवन अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन चुना लायेल कबरसनामायक शेतस, त्या बाहेरतीन सुंदर दखातस, पण मझारतीन मरेलसना हाडसनी अनं सर्व प्रकारना घाणनी भरेल शेतस;
28 तस तुम्हीन बाहेरतीन लोकसले न्यायी दिसतस, पण मझारतीन ढोंग अनं अधर्मनी भरेल शेतस.
येशुनाद्वारा त्यासनी शिक्षा
(लूक ११:४७-५१)
29 अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन संदेष्टासना कबरी बांधतस अनं साधु संतना कबरसले तुम्हीन सजाडतस.
30 अनी म्हणतस आम्हीन आमना वाडवडीलसना काळमा त्यासनासंगे राहतुत तर संदेष्टासनी हत्या करामा आम्हीन त्यासले साथ नही देतुत.
31 यावरतीन तुम्हीन स्वतःच सांगतस की, तुम्हीन संदेष्टासनी हत्या करनारासना पोऱ्या शेतस;
32 तुम्हीन, तुमना पुर्वजसनी जी वाईट करणी करीसन आर्ध माप भरेल शे, ते तुम्हीन दुष्टाई करीसन पुरं भरी टाका.
33 अरे सापसवन, सापसना पिल्लसवन नरकमा जावानी शिक्षा तुम्हीन कशी चुकाडशात?
34 म्हणीन दखा, मी तुमनाकडे संदेष्टासले, ज्ञानी लोकसले अनं शास्त्री यासले धाडसु; तुम्हीन त्यामाधला कित्येक जणसले मारी टाकशात अनं काहीसले क्रुसखांबवर खियासघाई ठोकीन मारशात अनी बाकीनासले तुमना सभास्थानमा फटका मारशात अनं प्रत्येक शहरमा त्यासले त्रास देत फिरशात.
35 अनी जितला न्यायी लोकसनं रंगत पृथ्वीवर व्हावाडेल शे ते तुमना माथे पडी, याना अर्थ न्यायी हाबेल पाईन तर बरख्याना पोऱ्या जखऱ्या पावत, ज्यासले तुम्हीन मंदिर अनी वेदीना मझार मारी टाकेल शे.
36 मी तुमले सत्य सांगस, की ह्या सर्वा गोष्टी हाई पिढीना माथे पडीतीन.
यरूशलेम शहरबद्दल येशुनी कळकळ
(लूक १३:३४,३५)
37 “यरूशलेमा, यरूशलेमा, तु संदेष्टासले मारी टाकस अनी ज्यासले तुनाकडे धाडतस त्यासले तु दगडमार करस, मनी कितलींदाव ईच्छा व्हती की, जशी कोंबडी तिना पिल्लासले आपला पंखखाल गोळा करस तसच मी बी तुना पोऱ्यासले गोळा करसु,” पण तुनी ईच्छा नव्हती!
38 म्हणीन आते तुमनं घर ओसाड अवस्थामा तुमलेच सोपी देयल शे.
39 मी तुमले सांगस की, आत्तेपाईन “प्रभुना नावतीन येणारा तो आशिर्वादित शे, अस म्हणशात तोपावत मी तुमना नजरमा पडावु नही.”