11
बाप्तिस्मा करनारा योहान कडतीन संदेश
मंग अस व्हयनं की, येशु आपला बारा शिष्यसले बोध करानंतर, तो तठेन नगरमा शिकाडाले अनं उपदेश कराले गया. जवय कैदखानामा योहाननी ख्रिस्तनी चमत्कारबद्दल माहीती ऐकी, तवय आपला शिष्यसले त्यानाजोडे हाई ईचाराले धाडं, जो येणारा व्हता तो तु शे, की आम्हीन दुसरानी वाट दखुत? येशुनी त्यासले सांगं, जे तुम्हीन ऐकतस अनी दखतस ते योहानले जाईसन सांगा; आंधया दखतस, पांगया चालतस कोडी बरा व्हतस, बहिरा ऐकतस, मरेल जिवत व्हतस अनं गरीबसले संदेश सांगामा येस; धन्य शे, तो जो मनाबद्दल शंका धरस नही. योहानना शिष्य जावावर येशु लोकसनी गर्दीले त्यानाबद्दल सांगु लागना, तुम्हीन जंगलमा योहानले दखाले जायेल व्हतात? तवय तो तुमले वाराना झोतघाई हालणारा गवतनामायक वाटी राहींता काय? तर मंग तुम्हीन काय दखाले जायेल व्हतात? मऊ कपडा घालेल माणुसले का? दखा, मऊ कपडा वापरणारा तर राजवाडामाच राहतस. तर मंग तुम्हीन कसाले जायल व्हतात? एखादा संदेष्टाले दखाले का? तर मी तुमले खरंखरं सांगस, संदेष्टापेक्षा जो मोठा माणुस त्याले दखाले तुम्हीन जायल व्हतात. 10 हाऊ तोच योहान शे ज्यानाबद्दल लिखेल शे, दखा, मी मना दूतले तुनापुढे धाडसं, तो तुनापुढे तुनी वाट तयार करी. 11 मी तुमले सत्य सांगस की, बाईपाईन जन्मले माणसंसमा कोणी बाप्तिस्मा करनारा योहानपेक्षा श्रेष्ठ व्हयना नही; तरी स्वर्गना राज्यमा धाकला जो शे तो योहानपेक्षा बी श्रेष्ठ शे. 12 बाप्तिस्मा करनारा योहान ह्याना दिनपाईन आत्तेपावत स्वर्गना राज्यवर हल्ला चाली राहीनात, अनी हल्ला करणारा लोके ते लेवाकरता प्रयत्न करी राहिनात. 13 कारण मोशेना नियमशास्त्र अनी सर्वा संदेष्टा ह्या योहान पर्यंत संदेश देत वनात. 14 मी सांगस, ते तुमनी मान्य करानी तयारी व्हई तर जो एलिया येणार शे, तो हाऊच शे. 15 ज्यासले ऐकाले कान शेतस त्या ऐकोत. 16 हाई पिढीले मी कसानी उपमा देऊ? ह्या लोके बजारमा बसेल पोऱ्यासना मायक शेतस ज्या आपला मित्रसले हाक मारीन सांगतस, 17 अनी म्हणतस आम्हीन तुमनाकरता पावा वाजाडा, तरी पण तुम्हीन नाचनात नही, अनी आम्हीन मरणना शोकगीत म्हणं तरी तुम्हीन शोक करा नही, त्या पोऱ्यासना मायक हाई पिढी शे. 18 कारण बाप्तिस्मा करनारा योहान हाऊ खातपित वना नही, तरी लोक त्याले भूत लागेल शे अस म्हणतस. 19 मनुष्यना पोऱ्या वना, तो खासपेस; तरी त्यानाबद्दल बोलतस, दखा, हाऊ खादाड अनी दारूबाज माणुस, जकातदारसना अनी पापी लोकसना मित्र! पण देवनं ज्ञान आपला कार्यवरतीन न्यायी ठरस.
बिनईश्वासी गावसबद्दल दुःख
20 मंग ज्या शहरसमा त्यानी बराच चमत्कार करेल व्हतात, तरी पण तठला लोके देवकडे वळनात नहीत म्हणीन तो त्यासले दोष देऊ लागना. 21 हे खोराजिना, तुनी अवस्था कशी व्हई! हे बेथसैदा, तुनी कितली खराब अवस्था व्हई! कारण ज्या चमत्कार मी तुमनामा करात त्या जर सोर अनं सिदोन ह्या शहरसमा करतु तर त्या त्याच येळले गोणताट लाईन अनं राखमा बशीन पापसपाईन मांगे फिरतात. 22 पण मी तुमले सांगस की, न्यायना दिनले सोर अनं सिदोन यासले मिळणारी शिक्षा तुमले मिळणारी शिक्षापेक्षा सोपी राही. 23 हे कफर्णहुम, तु आकाशपावत चढी जाशी का? तु नरकमा खालपावत उतरशी; कारण ज्या चमत्कार तुमनामा घडनात त्या जर सदोममा घडतात तर आज त्या ईश्वासमा ऱ्हातात. 24 मी तुमले सांगस की, न्यायना दिनले तुमले मिळणारी शिक्षा सदोमले मिळणारी शिक्षापेक्षा जास्त राही.
येशुनी कामगीरी
25 त्या येळले येशु सांगु लागना, हे बापा, स्वर्गना अनं पृथ्वीना प्रभु, मी तुनी स्तुती करस कारण की, ज्ञानी अनी ईचारवंत लोकसपाईन ह्या गोष्टी गुप्त ठेईन त्या तु धाकला पोऱ्यासले प्रकट करेल शे. 26 खरच हे बापा, कारण हाईच तुले योग्य दखायनं.
27 मना बापनी सर्वकाही मना हातमा सोपेल शे, अनी बापशिवाय पोऱ्याले कोणी वळखत नही अनी पोऱ्याशिवाय अनं पोऱ्यानी ज्या कोणले बापनी वळख करी देवानी ईच्छा व्हई त्यानाशिवाय बापले कोणीच वळखत नही. 28 अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु. 29 मी जशा मनना लीन अनं नम्र शे तो मना जू तुम्हीन तुमनावर ल्या, अनं मनापाईन शिका म्हणजे तुमना जिवले विसावा मिळी; 30 कारण मना जू सोयना अनं मना वझा हलका शे.
11:10 मलाखी ३:१ 11:12 लूक १६:१६ 11:14 मत्तय १७:१०-१३; मार्क ९:११-१३ 11:24 मत्तय १०:१५; लूक १०:१२ 11:27 योहान ३:३५; योहान १:१८; १०:१५