11
यरूशलेममा येशुना जयोत्सवमा प्रवेश
(मत्तय २१:१-११; लूक १९:२८-४०; योहान १२:१२-१९)
1 यरूशलेम जवळना बेथफगे अनी बेथानी या गावजवळना जैतुनना डोंगरवर त्या वनात, तवय येशुनी आपला शिष्यसमातीन दोन जणसले समजाडीन धाडं की,
2 समोरना गावमा जा, तठे जाताच ज्यावर कधीच कोणी माणुस बशेल नही अस गधडानं एक शिंगरू बांधेल दखाई ते सोडीसन आणा.
3 तुम्हीन अस का बरं करी राहिनात, अस जर कोणी ईचारं तर सांगा, प्रभुले यानी गरज शे अनी तो लगेच याले परत धाडी दी.
4 तवय त्या गावमा गयात तठे वाटवर एक घरना दारसमोर गधडानं पिल्लु त्यासले बांधेल दखायनं. त्या त्याले सोडाले लागनात.
5 तवय तठे ज्या उभा व्हतात त्यासनी त्यासले ईचारं, “काय करी राहीनात? तुम्हीन गधडानं पिल्लुले का बर सोडी राहिनात?”
6 जसं येशुनी त्यासले सांगेल व्हतं तसं त्यासनी उत्तर दिधं, मंग त्यासनी त्यासले ते गधडानं पिल्लु लई जाऊ दिधं.
7 नंतर त्या गधडाना शिंगरूले येशुजोडे लयनात अनं त्यानावर आपला कपडा टाकात अनी त्यानावर येशु बसना.
8 मंग बराच लोकसनी आपआपला कपडा वाटवर पसारात, बाकिनासनी वावरमातीन खजुरन्या झाडन्या फांद्या आणीन वाटवर पसाऱ्यात.
9 अनी त्यानापुढे अनं मांगे चालणार गजर करीसन बोली राहींतात, “देवनी स्तुती व्हवो! प्रभुना नावतीन येणारा धन्यवादित असो!
10 आमना बाप दावीद राजा, ह्यानं येणारं राज्य धन्यवादित असो! देवनी स्तुती व्हवो!”
11 नंतर तो यरूशलेममा वना अनी मंदिरमा गया, तो मंदिरना चारीबाजु दखी राहिंता. दखता दखता संध्याकाय व्हयनी मंग तो बारा शिष्यससंगे बेथानीले निंघी गया.
येशु अंजिरना झाडले शाप देस
(मत्तय २१:१८,१९)
12 दुसरा दिन त्या बेथानीतीन निंघनात तवय येशुले भूक लागणी.
13 तवय पानटासनी भरेल अंजिरनं झाड त्यानी दुरतीन दखं अनी त्यावर काही अंजिर भेटतीन म्हणीन तो त्यानाजोडे गया. पण त्याले फळच नव्हतं, कारण अंजिरना हंगाम येल नव्हता.
14 तवय येशुनी अंजिरना झाडले सांगं, “यानापुढे कधीच कोणी तुनं फळ खावाव नही!”
अनी हाई त्याना शिष्यसनी ऐकं.
येशु मंदिरमा जास
(मत्तय २१:१२-१७; लूक १९:४५-४८; योहान २:१३-२२)
15 मंग त्या यरूशलेममा वनात, अनी येशु मंदिरमा जाईसन तठे व्यापार करनारासले बाहेर हाकलु लागना. अनी पैसा अदल बदल करनारासना चौरंग उलथा पालथा करी टाकात, त्यासले अनी कबुतर ईकनारासले बाहेर काढी टाक.
16 अनी मंदिर आंगनमातीन विक्रीना मालले ने आण करानीसुध्दा त्यानी मनाई करी.
17 तो त्यासले उपदेश करू लागणा, “मना घरले सर्व राष्ट्रमाधला लोकसनं प्रार्थनास्थान म्हणतीन,” असं देवनी सांगेल शास्त्रमा लिखेल शे, पण “तुम्हीन त्याले लुटारूसनी गुहा करी टाकेल शे!”
18 हाई मुख्य याजक अनी शास्त्रीसनी ऐकं अनी येशुले मारानं कसं यानी योजना आखाले लागनात. कारण त्या त्याले घाबरी राहींतात, यामुये की सर्व लोके त्याना शिक्षणवरतीन थक्क व्हई जायेल व्हतात.
19 मंग संध्याकायले येशु अनी त्याना शिष्य रोजप्रमाणे नगरना बाहेर गयात.
श्रध्दानं सामर्थ्य
(मत्तय २१:२०-२२)
20 मंग पहाटले तिच वाटतीन जातांना त्यासनी ते अंजिरनं झाड मुळपाईन सुकी जायल व्हतं अस दखं.
21 तवय पेत्रले आठवण वनी तो येशुले बोलना, “गुरजी, दखा, तुम्हीन ज्या अंजिरना झाडले शाप देयल व्हता ते सुकाई जायल शे.”
22 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “देववर ईश्वास ठेवा.
23 मी तुमले सत्य सांगस, जो कोणी हाऊ डोंगरले, तु उपटीसन समुद्रमा टाकाई जा, अस म्हनी अनी आपला मनमा शंका नही धरता मी म्हणसु ते व्हई जाई असा ईश्वास धरी तर ते व्हई जाई.
24 यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
25 जवय तुम्हीन उभा राहिसन प्रार्थना करतस तवय तुमना मनमा कोणाबद्दल काही राग व्हई तर त्याले माफ करा; यानाकरता की तुमना स्वर्गीय पिता परमेश्वर तुमना अपराधसनी क्षमा कराले पाहिजे.
26 पण तुम्हीन जर क्षमा कराव नही तर तुमना स्वर्ग माधला बाप पण तुमना अपराधसनी क्षमा करावु नही.”
येशुना अधिकारबद्दल संशय
(मत्तय २१:२३-२७; लूक २०:१-८)
27 मंग त्या परत यरूशलेमले वनात, अनी येशु मंदिरमा फिरी राहिंता तवय त्यानाकडे मुख्य याजक, शास्त्री, अनी वडील लोके ईसन त्याले बोलणात,
28 “तुम्हीन हाई काम कोणता अधिकारतीन करतस अनी हाई कराना अधिकार तुमले कोणी दिधा?”
29 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी बी तुमले एक प्रश्न ईचारस, माले उत्तर द्या, म्हणजे कोणता अधिकारतीन मी हाई करस ते तुमले सांगसु.
30 योहानले बाप्तिस्मा देवाणा अधिकार देवकडतीन व्हता की, माणुसकडतीन व्हता? यानं माले उत्तर द्या.”
31 तवय त्या एकमेकसले ईचारू लागणात देवकडतीन व्हता अस जर म्हणं तर हाऊ म्हणी अस व्हतं मंग तुम्हीन योहानवर का बर ईश्वास ठेवा नही?
32 माणुसकडतीन व्हता अस जर म्हणं तर सर्व लोके आपलाविरूध्द ऊठतीन यानी भिती त्यासले वाटनी कारण योहान खरच संदेष्टा व्हता असा सर्व मानेत.
33 तवय त्यासनी येशुले उत्तर दिधं, “आमले माहीत नही.” येशुनी त्यासले सांगं, “मंग मी पण तुमले सांगत नही कोणता अधिकारतीन मी हाई करस.”